आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र पित्याला जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर- पित्याच्याच अत्याचारामुळे गर्भवती राहून अल्पवयीन माता बनलेल्या मुलीला अखेर न्याय मिळाला. याप्रकरणी घोटी शिळवंडी (ता. अकोले) येथील सावत्र बापाला जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

पीडित मुलगी ही आरोपीच्या दुसऱ्या पत्नीच्या पहिल्या पतीची मुलगी आहे. ती चार वर्षांची असल्यापासून सावत्र वडिलांकडे रहात होती. आरोपीचेही पहिले लग्न झाले अाहे. त्याला आधीची काही अपत्ये आहेत. सातवीपर्यंत आश्रमशाळेत शिकलेल्या पीडितेला २०१३ मध्ये आरोपीने शाळेतून काढून सावत्र भावंडांचा सांभाळ करण्यासाठी घरी ठेवून घेतले. मे २०१३ मध्ये आरोपी दारु पिऊन घरी आला. त्याने पीडितेच्या आईला शिवीगाळ, मारहाण करत घराबाहेर काढले आणि दार लावत पीडितेवर अत्याचार केला. हा प्रकार आई किंवा अन्य कोणाला सांगितला, तर सर्वांना मारण्याची धमकी आरोपीने दिली. यातून मुलीला दिवस राहिले. 

जिल्हा सत्र न्यायाधीश जे. एम. गांधी यांच्यासमोर सुनावणी झाली. पीडितेतर्फे सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. सहायक सरकारी वकील वाकचौरे यांनी अनेक गोष्टी निदर्शनास आणून देत भक्कम पुरावे सादर केले. न्यायाधीश गांधी यांनी आरोपीला जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. 

पीडितेच्या बाळाची डीएनए चाचणी 
मुलीवरपित्याकडून अत्याचार होत असल्याची माहिती राजूर पोलिसांना समजल्यावर सहायक निरीक्षक राहुल पाटील यांनी तिची सुटका केली. तिला स्नेहालय संस्थेच्या ताब्यात देण्यात आले. तक्रार दाखल करतेवेळी पीडिता सात महिन्यांची गरोदर होती. खटल्यादरम्यान स्नेहालयात तिचे बाळंतपण झाले. न्यायालयात झालेल्या साक्षीदरम्यान मुलीची आई फितूर झाली. पीडितेला झालेल्या बाळाची डीएनए करण्यात आली होती. त्या अहवालाच्या आधारे सरकारी वकील संजय वाकचौरे यांनी बाजू मांडली. 
बातम्या आणखी आहेत...