आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून करणाऱ्या पत्नी, मदत करणाऱ्या जावयास जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - पतीचाखून करणारी पत्नी कमल जालिंदर साबळे (वय ४८) आणि मदत करणारा जावई अशोक मलका अातकारे (वय ३०) यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. दारू पिऊन नेहमी त्रास देणाऱ्या पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने जावयाच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केला. त्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी शिक्षा सुनावली.
जालिंदर शंकर साबळे (वय ५०, रा. नरखेड, मोहोळ) यांचा खून झाला. मुलगा अरुण जालिंदर साबळे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती. ही घटना १० मार्च २०१०ला घडली.
जालिंदर यांना दारूचे व्यसन होते. नेहमी ते पत्नी कमल यांच्याशी भांडण करून त्रास देत होते. याला त्या कंटाळल्या होत्या. त्यांना दोन मुले असून अरुण हा इचलकरंजी येथे तर दुसरा मुलगा कराड येथे कामाला होते. मुलीला नरखेड गावातच दिले होते. त्यामुळे जावई अशोक हा नेहमी घरी ये-जा करत. पतीच्या त्रासाला कंटाळून कमल यांनी जावयाच्या मदतीने उसतोड कोयत्याने गळ्यावर वार केला. गळा चिरल्यामुळे ते जागीच मरण पावले. हा प्रकार मंगल बापू पवार यांनी पाहिला होता.

खटल्यात सात साक्षीदार तपासण्यात अाले. जालिंदर यांचा मृत्यू घरातच झाला त्यावेळी अारोपी घरातच होते. हेतूपरस्पर पोलिसात घटनेची माहिती दिली नाही. हा गुन्हा जाणीवपूर्वक केल्याचा युक्तिवाद सरकारतर्फे अॅड. नीलेश जोशी यांनी केला. साक्षीदार परिस्थितीजन्य पुरावा ग्राह्य धरण्यात अाला. दोघांना जन्मठेप पाच हजार रुपये दंड ठोठावण्यात अाला. अारोपीतर्फे अजमोद्दीन शेख, उमेश भोजने या वकिलांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...