आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी नगरसेविका रस्त्यावर, आयुक्तांकडे तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कोट्यवधी रुपये खर्च करून विविध भागांत बसवलेल्या पथदिव्यांचा बाेजवारा उडाला आहे. दिवे बंद पडल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या आठ दिवसांत पथदिव्यांची दुरुस्ती झाली नाही, तर नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नगरसेविका शारदा ढवण यांनी दिला आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन चोऱ्या महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास थेट आयुक्तांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करणार असल्याचे ढवण यांनी स्पष्ट केले.

सावेडी उपनगरातील प्रभाग मधील नगरसेविका ढवण यांनी बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. अधिकारी कर्मचारी तक्रारीची दखल घेत नसल्याने त्यांनी दोन-तीनदा आंदोलनेही केली. दिगंबर ढवण यांनी, तर विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब सावळे यांना चक्क चार तास कोंडून ठेवले होते, तरी देखील गेंड्याची कातडी असलेल्या महापालिका प्रशासनाला जाग आलेली नाही.

प्रभाग प्रमाणेच शहराच्या विविध भागातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे चोऱ्या महिलांच्या छेडछाडीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ढवण यांनी पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. अाठ दिवसांत कार्यवाही झाली नाही, तर महापालिकेच्या विराेधात नागरिकांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. चोऱ्या महिलांच्या छेडछाडीचा प्रकार पुन्हा घडल्यास त्यास आयुक्तांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने बंद पडलेल्या पथदिव्यांच्या दुरुस्तीची कार्यवाही तातडीने सुरू करावी, अशी मागणी ढवण यांनी केली आहे.

लोकवर्गणीतून दिवे
मनपापथदिवे बसवत नसल्याने आम्ही आमच्या प्रभागात लोकवर्गणीतून दिवे बसवले. या दिव्यांची देखभाल, तरी मनपाने करावी, अशी आमची मागणी आहे. त्याकडेदेखील मनपाचे अधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे आंदोलन करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही.'' शारदाढवण, नगरसेविका.

महापालिकेकडे साहित्यच नाही...
सर्वचप्रभागांतील नगरसेवक बंद पडलेल्या पथदिव्यांबाबत मनपाकडे तक्रार करत आहेत. मात्र, दिव्यांची दुरुस्ती होत नसल्याने नगरसेवक हतबल झाले आहेत. मनपाकडे दिव्यांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्युतीकरणाचे साहित्य खरेदी करण्यासाठी मनपाने निविदा मागवल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...