आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वनिप्रदूषणाची मर्यादा पाळल्यास कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जयंतीला निघणाऱ्या मिरवणुकीत सर्वच मंडळांनी ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिला.
जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांची बैठक गुरुवारी तोफखाना पोलिस ठाण्यात घेण्यात आली. उपअधीक्षक अनंत भोईटे, तोफखाना ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश मोरे यांनी यावेळी मार्गदर्शन करताना कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत करण्याचे आवाहन केले. ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आवाज नियंत्रित ठेवण्यास सांगण्यात आले. कायद्याचे पालन करणार नाहीत, अशा मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पारंपरिक वाद्ये वाजवण्यास परवानगी देण्याची विनंती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. मिरवणुकीत डीजेचा वापर करणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या बैठकीला अनंत लोखंडे, राम वडागळे, अंकुश मोहिते यांच्यासह शहर, भिंगार बोल्हेगाव येथील मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिस्तबद्ध मंडळाला मिळेल फिरती ढाल
ध्वनिप्रदूषणाबाबतन्यायालयाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले आहे. यंदा पहिल्यांदाच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती मिरवणुकीत शिस्तबद्ध मंडळाला फिरती ढाल बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक देशमुख यांनी या बैठकीत जाहीर केले.