आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lions Club Organized 'Run For Hope' In Ahmednagar

‘रन फॉर होप’मध्ये धावले ३ हजार नगरकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- लायन्स क्लब आयोजित ‘रन फॉर होप’मध्ये रविवारी तीन हजार नगरकर धावले. मूकबधिर युवक-युवती व वृद्धांनीही मोठ्या हिरीरीने सहभाग नोंदवला. अर्जुन पुरस्कारप्राप्त पंकज शिरसाठ यांच्या हस्ते वाडिया पार्क क्रीडा संकुलात मॅरेथॉनला प्रारंभ झाला. ही मॅरेथॉन तीन किलोमीटर लांबीची होती.
विशेष गटाच्या स्पर्धेची सुरुवात किरण भंडारी, देवेंद्रसिंग वधवा यांच्या हस्ते, तर मुख्य आकर्षण असलेल्या ड्रीम रनची सुरुवात आर. जे. प्रसन्ना, विद्या जोशी, महेश पाटील, अजय मुथ्था, सनी वधवा, अभिजित भळगट यांनी केली. आमदार तथा महापौर संग्राम जगताप यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. सूत्रसंचालन हरजितसिंग वधवा यांनी केले. ड्रीम रन स्पर्धा ७७ वर्षांचे डॉ. पी. बी. झगडे यांनी ४० मिनिटांमध्ये पूर्ण केली. सर्वात लहान स्पर्धक ठरला ४ वर्षांचा गुरनुरसिंग वधवा व शरणजित माखिजा. मूकबधिर स्पर्धकांतील विजेत्यांना बाबूशेठ टायरवाले यांनी पाच हजारांचे पारितोषिक दिले. ड्रिम रन - अरुण घोलप, १८ वर्षे - भिवा झिटे व ऐश्वर्या कल्याणकर, १४ वर्षे तुषार घोलप व कोमल साबळे, विशेष गटात गीताराम उगडे, तर १४ वर्षे गटात पायल लोंढे हिने विजय मिळवला.