आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर जिल्हा रुग्णालयातील कँटीनमध्ये बनावट दारूचा कारखाना, कँटीनचालकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगरच्या जिल्हा रुग्णालयाच्या उपाहारगृहात बनावट दारूचा कारखानाच असल्याचे बुधवारी उघड झाले. पोलिसांनी कँटीनचालक माजी नगरसेवक जितू गंभीरसह एका तथाकथित पत्रकाराला अटक केली आहे. 

दरम्यान, नगर तालुक्यातील पांगरमल येथील दारूकांडातील आणखी दोघांचा बुधवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या सहा झाली. आणखी सात जणांवर उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.पांगरमल येथील पार्टीसाठी दारूची खरेदी जिल्हा रुग्णालयातील संबंधित कारखान्यातून केल्याचे चौकशीतून पुढे आल्यामुळे पोलिसांनी कारवाई केली. एक आरोपी भीमराव आव्हाड याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. चौकशीत त्याने जिल्हा रुग्णालयातील उपाहारहारगृहातून दारू खरेदी केल्याचे सांगितल्याने सकाळीच तेथे छापा टाकण्यात आला. 
 
त्या वेळी बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य तेथे आढळले. याशिवाय विविध कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्या, त्यांची बुचे, प्लास्टिक कव्हर, अल्कोहाेलसदृश पदार्थाच्या बाटल्या, चॉकलेटी रंगाचा खाद्य रंग, बॉबी व संत्रा या देशी दारूच्या ब्रँडच्या बाटल्या असा माल हस्तगत केला आहे.
 
बातम्या आणखी आहेत...