आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Literature: Pais Column Invited For Marathi Sahitya Sammelan

साहित्यविश्‍व: मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण पैस खांबास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची पहिले निमंत्रण मराठी भाषेचे उगमस्थान असलेले नेवाशाच्या ज्ञानेश्वरीचे लिखाणस्थान असलेल्या पैस खांबास समारंभपूर्व देण्यात आली. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी सोमवारी सत्तराव्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या उपस्थितीत हे निमंत्रण दिले.
यावेळी ज्ञानेश्वर मंदिराचे विश्वस्त शिवाजी महाराज देशमुख, साहित्य संघाचे समन्वयक सचिन ईटकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सु. प्र. कुलकर्णी, एन. टी. परदेशी ऋतुरंगचे अरुण शेवते तसेच मुळा शिक्षण मंडळाचे प्रशांत गडाख आदी उपस्थित होते.

यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने पी. डी. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिवाजी महाराज देशमुख म्हणाले, मराठी भाषेचे उगमस्थान असलेल्या ज्ञानेश्वरी लिखाण स्थानाला स्वागताध्यक्षांनी पत्रिका दिली म्हणजे साक्षात ज्ञानेश्वरांना वारकरी संप्रदायाला दिली आहे. पैस म्हणजे अध्यात्माचा मार्ग आहे. जगाच्या कल्याणासाठी समृद्धीसाठी विज्ञानाबरोबरच अध्यात्माची जोड आवश्यक आहे. साहित्य संमेलनाला या निमंत्रणामुळे अध्यात्मिक उंची मिळाली. त्यामुळे हे संमेलन यशस्वी होईल, असे आशिर्वाद त्यांनी दिले.

पी. डी. पाटील म्हणाले, आमचे भाग्य आहे की आम्ही ज्ञानेश्वर चरणी आलो. यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे ८० वे साहित्य संमेलन यशस्वी करू. यासाठीच माऊलीचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत.

श्रीपाल सबनीस यांच्या वक्तव्यावर 'नो कॉमेंट्स'
साहित्यसंमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत बोलण्यास पी. डी. पाटील यांनी टाळले. स्वागताध्यक्षाची जबाबदारी संमेलन चांगले पार पाडण्याचे यशस्वी करण्याची आहे. ही भूमिका आम्ही पार पाडू. साहित्य संमेलन शांततेने पार पडावे ही अपेक्षा त्यांनी व्यक्त करतानाच सर्वांनी साहित्यावर प्रेम दाखवावे, असे आवाहन पाटील यांनी केले.