आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माहिती देता भारनियमन सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सव संपताच महावितरणने ग्राहकांना माहिती देता सोमवारपासून (२८ सप्टेंबर) भारनियमन सुरू केले. गणेशोत्सवात काही अंशी भारनियमन बंद केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, गणेशोत्सव संपताच भारनियमन आणि सतत खंडित वीजपुरवठ्याने डोकेदुखी वाढली आहे.

शहरात गेल्या दोन दिवसांपासून इमर्जन्सीच्या नावावर केव्हाही वीज पुरवठा खंडित केला जात आहे. तर क, ड, ई, ग-१, ग-२, ग-३ या गटांमध्ये शहरात काही ठिकाणी तीन तास, काही ठिकाणी चार तासांचे भारनियमन होत आहे. सोमवारी बालिकाश्रम रोड, माळीवाडा, सिव्हील हडको, भिंगार या परिसरामध्ये दिवसभर अर्ध्या,एका तासाने वीज जात होती. बालिकाश्रम रोड परिसरात रात्री आठ वाजता गेलेली वीज नऊ वाजता अाली. मंगळवारी सकाळी अशीच स्थिती होती. महािवतरणच्या या कारभारामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. महावितरणच्या थकीत बिल आणि गळतीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या गटांनुसार भारनियमन केले जाते. यापूर्वी शहरातील मुकुंदनगर, फकिरवाडा फिडरवर गळती अधिक असल्याने भारनियमन होत होते. गळती कमी होऊन संपूर्ण शहरच भारनियमन मुक्त होईल, अशा वावड्या उठवल्या जात होत्या. मात्र, महावितरणच्या पायलट प्रोजेक्टमुळे शहरातील वीज बिलांची थकबाकी वाढून गळतीचे प्रमाण वाढले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने विजेचीही मागणी वाढली.

उकाड्याने हैराण
भारनियमन सुरू करण्यापूर्वी ग्राहकांना सूचना दिल्या नाहीत. खंडित वीज पुरवठा आणि 'ऑक्टोबर हीट' पूर्वीच होत असलेल्या उकाड्याने हैराण झाले आहे. त्यात आता भारनियमनाने अधिकच त्रस्त केले आहे. उद्धव शिंदे, भिंगार.

गळती रोखण्यात महावितरण अपयशी
भारनियमनकमी होणे, तर दूरच मात्र त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांमध्ये रोष निर्माण होत आहे. महावितरणने वीज गळती कमी करण्यासाठी शहरातील सर्वच भागात आयआर मीटर बसवण्याचे प्रयत्न केले. मात्र, हा प्रकल्पही संथगतीने राबवला जात आहे. त्यामुळे वीज गळतीचे प्रमाण वाढले आहे. ही गळती रोखण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. सतीश इंगळे, नागरिक, माळीवाडा.

विजेची मागणी वाढल्याने भारनियमन
विजेची मागणी वाढल्याने आिण कृषिपंपांचा वापर वाढल्याने सोमवारपासून शहरात अ, गट सोडून सर्व गटांमध्ये भारनियमन सुरू करण्यात आले आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात तूट निर्माण होत असल्याने भारनियमन सुरू झाले आहे.'' एस.एस. जाधव, कार्यकारीअिभयंता, महावितरण.