आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारनियमनाचा नगरला फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यातील अकरा वीज निर्मिती संच बंद पडल्यामुळे, तसेच मागणीच्या तुलनेत पुरेशी वीज तयार होत नसल्याने संपूर्ण राज्यावर भारनियमनाचे संकट कोसळले आहे. अ, ब, क गटातील फीडर वगळता इतर सर्व फीडरवर भारनियमन करण्याचे आदेश महावतिरणच्या वरिष्ठ कार्यालयातून आले आहेत. त्यामुळे बाजार समिती वगळता संपूर्ण नगर शहरात साडेपाच ते साडेआठ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. रमजानमुळे जुलैत भारनियमन बंद करण्यात आले होते. जुलैमध्ये अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. त्यामुळे विजेच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात भारनियमन झाले नाही. मात्र, १७ ऑगस्टपासून पुन्हा भारनियमन सुरू झाले आहे. नगर शहर व परिसरात महावतिरणची एकूण ९ उपकेंद्रे आहेत. त्यावर २३ फीडर आहेत. त्यामुळे हा परिसर भारनियमनातून वगळण्यात आला आहे. उर्वरति १४ फिडर फ गटात, तर ३ फीडर ग गटात आहेत. ड गटातील फीडरवर साडेपाच तास, ई गटातील फीडरवर सव्वासहा तास, फ गटातील फीडरवर ७ तास व ग गटातील फीडरवर भारनियमन सुरू करण्यात आले आहे. शहरातील सुमारे ९५ टक्के भागात भारनियमन सुरू झाल्यामुळे बाजारपेठ, छोटे-मोठे व्यावसायिक, लघू उद्योजक यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील भारनियमन कमी करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचवि वसंत लोढा यांच्या नेतृत्वाखाली महावतिरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी यांना निवेदन देण्यात आले.