आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"बालगृहांत स्थानिक समिती बंधनकारक'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रत्येक सरकारी स्वयंसेवी संस्था संचलित बालगृहांमध्ये स्थानिक व्यवस्थापन समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. या समितीच्या माध्यमातून बालगृहांची गुणवत्ता सुधारेल, असे प्रतिपादन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी बाळा हेडे यांनी केले. संगमनेर येथील प्रादेशिक अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृहात आयोजित करण्यात आलेल्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हेडा बोलत होते. बाल संरक्षण अधिकारी कुंदन पठारे, बाल कल्याण समिती सदस्य राजेंद्र पवार आदी यावेळी उपस्थित होते. महिला बालकल्याण विकास विभाग आयसीपीएस अंतर्गत जिल्ह्यात एकूण ६४ बालगृहे चालवली जातात.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. संस्थेचे अधीक्षक हे सदस्य सचिव, तर परिविक्षा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक, व्यावसायिक कौशल्य शिक्षण तज्ज्ञ, बालन्याय मंडळ किंवा बालकल्याण समिती सदस्य संबंधित संस्थेतील बालक प्रतिनिधी हे समिती सदस्य आहेत. संरक्षणाची गरज असलेल्या बालक हिताचे निर्णय घेतल्याचे हेडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...