आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Crime Branch, Latest News In Divya Marathi

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- घरफोडी करणा-या तिघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने गजाआड केले. त्यांच्याकडून सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. नगर, पाथर्डी, नेवासे, राहुरी व वैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यात अकरा घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. हा माल विकत घेणा-या तिघांनाही पोलिसांनी आरोपी केले आहे.
नगर-दौंड रस्त्यावरील अरणगाव परिसरात तिघेजण दुचाकीवर बसून जाताना गुन्हे शाखेच्या गस्ती पथकाने पाहिले. संशय आल्यामुळे पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. अरणगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेजवळ पोलिसांनी या दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता शिवतेज शिवाजी जावळे (20), अशोक अंबादास भडके (23) व दिलीप गीताराम दहातोंडे (25, सर्व चांदा, ता. नेवासे) अशी नावे त्यांनी सांगितली. झडती घेतली असता त्यांच्याकडील पोत्यामध्ये संगणक संच, पितळी समई, अ‍ॅम्प्लिफायर, ऑईलच्या बाटल्या व इतर साहित्य मिळाले.
कसून चौकशी केली असता हे संगणक व इन्व्हर्टर चोरीचे असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्या सांगण्यानुसार सतीश सुरेश पुंड, शरद दत्तात्रेय मेहेत्रे (दोघेही सोनई) यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस अधीक्षक लखमी गौतम, अतििरक्त अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक शशिराज पाटोळे, संजय पाटील यांच्या पथकातील सहायक निरीक्षक सुनील टोणपे, हेड कॉन्स्टेबल मधुकर शिंदे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, दादासाहेब काकडे, विशाल अमृते, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, अशोक गुंजाळ, ज्ञानदेव गव्हाणे, सचिन गोलवड यांनी ही कारवाई केली.

चोरलेला माल अशोक सोन्याबापू वावरे (नागापूर) याला विकल्याचे आरोपींनी सांगितले. त्यामुळे त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशीअंती आरोपींनी नगर तालुका, सोनई, पाथर्डी, राहुरी, एमआयडीसी तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात 11 ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकूण 8 लाख 16 हजार 317 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शाळांना केले टार्गेट
घरफोड्या करणारे बेरोजगार युवक आहेत. एकजण बारावीपर्यंत, तर दोघे चौथीपर्यंत शिकले आहेत. धनाढ्यांच्या घरात चोऱ्या केल्या, तर तळतळाट लागतो. त्यामुळे दुकाने, घरे फोडण्यापेक्षा सरकारी शाळांना चोरट्यांनी "टार्गेट' केले. शाळांमध्ये सरकार पैसा पुरवते. त्यामुळे इतर कोणाचा तळतळाट लागणार नाही, असा विचार त्यांनी केला.'' शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक.