आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Crime Branch Raided On Corporator Gamblors Spot

नगरसेवकाच्या जुगार अड्डय़ावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - श्रीरामपूर येथील सोमय्या हायस्कूल ते बाजारचौक रस्त्यावर सुरू असलेल्या जुगार अड्डय़ावर छापा टाकून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 22 जणांना अटक केली. मटका बुकी असलेला नगरसेवक राजेश अलग पसार झाला.

बाजारतळाच्या शेजारी मुरलीधर राठी याच्या तात्पुरत्या कार्यालयात जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांना समजली. एलसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी तेथे छापा टाकून 22 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 65 हजारांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. मुरलीधर राठी, हरिष गुप्ता, दीपक चव्हाण, संजय पवार, विनोद जगताप, खुदाबक्ष पटेल, लियाकत अली खान, लालजी परदेशी, बबन त्रिभुवन, सुनील जाधव, राजेश पाघारे, उत्तम कांबळे, अब्दुल शेख, भुजंग लोखंडे, हमीद बागवान, सुरेश शिरसाठ, किसन बिदारे, किरण पठारे, राहुल प्रधान, वसंत कुलकर्णी, शब्बीर शेख, मनोज भिंगारदिवे अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना श्रीरामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक निरीक्षक पुरुषोत्तम चोभे यांच्या नेतृत्वाखालील उपनिरीक्षक सुनील लहानेंच्या पथकाने ही कारवाई केली.