नगर - शीख,पंजाबी समाजाच्या वतीने गुरुद्वारा भाई दयासिंगजी गोविंदपुरा येथे पारंपरिक लोहडी उत्सव साजरा करण्यात आला. समाजबांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सिंधी बांधवांनीही लोहडी सण साजरा केला.
भाईसाहेब गुरभेजसिंग यांनी रेहराज साहेबचे पठण केले. उपस्थित भाविकांनी अरदास करून लोहडी उत्सवास प्रारंभ केला. गुरुद्वाऱ्याचे अध्यक्ष गुरुदयालसिंग वाही यांच्या हस्ते अग्नी देऊन लोहडी प्रज्वलित करण्यात आली. या वेळी हरजितसिंग वधवा, डॉ.गुरमितसिंग सहानी, जनक आहुजा, बलदेवसिंग वाही, रविंदर नारंग, अमरजितसिंग वधवा, बिट्टू मनोचा, हितेश कुमार, राजनारंग, प्रदीप धुप्पड, सतीश गंभीर, प्रदीप धुप्पड, राज गुलाटी, अनिश आहुजा, गोविंद खुराणा, राजेंद्र चावला, गुरभजन नारंग, भुपेंद्रसिंग अहुवालिया, राजू मक्कर, जी.एस. वीरदी, राकेश गुप्ता आदी उपस्थित होते.
लोहडी हा सण शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पीक कापणीसाठी तसेच घरात लग्न होऊन आगमन झालेले नवीन जोडपे अपत्यप्राप्ती झालेल्या मुला, मुलींच्या स्वागतासाठी हा उत्सव पंजाबी समाजात साजरा करण्यात येतो. ज्यांच्या घरी शुभकार्य झाले आहे, अशा लोकांकडे लोहडी मागण्याची प्रथा असल्याची माहिती हरजितसिंग वधवा यांनी दिली.
पेटलेल्या लोहडीभोवती महिलांनी प्रदक्षिणा मारुन दर्शन घेतले. तर यावेळी पंजाबी लोहडी गीतांनी परिसर दणानला होता. गुरुद्वाऱ्यात ज्यांच्या घरी लग्नाचे अपत्य प्राप्तीचे शुभकार्य झाले आहे. अशांनी लोहडी देण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल लावले होते. या खाद्य पदार्थांच्या स्टॉलवर भाविकांनी गर्दी करुन खाण्याचा आस्वाद घेतला.