आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार गांधींना लोक कर्कासूर पदवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - तंबाखूमुळे कर्करोग होत असल्याचे देशात संशोधन झाले नाही, असे सांगणारे खासदार िदलीप गांधी यांच्या या विधानाच्या िनषेधार्थ पीपल्स हेल्पलाइन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन पुरोगामी पक्षातर्फे गांधी यांना लोक कर्कासूर पदवी देऊन अभिनव पद्धतीने शनिवारी आंदोलन केले.

शहरातील हुतात्मा स्मारकात कॉम्रेड सुरेश संत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांधी यांना ही पदवी प्रदान करण्यात आली. शाहीर कान्हू सुंबे यांनी कर्कासुराचा वेश परिधान करून गळ्यात तंबाखू पुड्यांची माळ घालून आंदोलन केले. आंदोलनात कारभारी गवळी, सुधीर भद्रे, अशोक सब्बन, संजय जव्हेरी, दत्ता वडवणीकर, मधुकर बनसोडे, शाकीर शेख, भाऊसाहेब थोटे, प्रकाश थोरात, प्रेरणा थोरात, प्रा. सुभाष कडलग, रवींद्र सातपुते, प्रा. सीताराम काकडे, विश्वास लंके, कैलास पठारे आदी सहभागी झाले होते.

गवळी म्हणाले, देशातील १२८ कोटी जनतेला कर्करोग विकण्याचे काम खासदार गांधी यांनी केले आहे. त्यामुळे त्यांना ही लोकपदवी देण्यात आली आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधी हे सारासार विवेक सोडला राष्ट्रीय कर्तव्याशी बांधलेले असतात. मात्र, गांधी यांनी सारासार विवेक सोडला भ्रष्टाचारासाठी देशाला तंबाखूच्या माध्यमातून कर्करोग विकण्याचा धंदा सुरू केला. गांधी यांच्यामुळे जगभरात भारताची नाचक्की झाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कर्करोग झाला, राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा तंबाखूने बळी घेतला. ही बाब गांधी यांना समजूनही तंबाखूमुळे कर्करोग होत नसल्याचा जावईशोध लावला.