आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election In Marathi, Narendra Modi, BJP, Sadashiv Lokhande, Divya Marathi

भाजप पदाधिकार्‍यांचा ‘डोअर टू डोअर’ प्रचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदींना बसवण्यासाठी आपसातील मतभेद दूर ठेवत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मतदारांच्या दारापर्यंत जाण्याची मोहीम हाती घेतली आहे.
शिर्डीची जागा शिवसेनेकडे असल्याने भाजप पदाधिकार्‍यांमध्ये एरव्ही मरगळ जाणवत असे. आता मात्र हे पदाधिकारी महायुतीच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.

राजेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागली आहे. घराघरात, दुकानात जात महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. शिवसेनेच्या गटबाजीत सापडलेल्या महायुतीच्या उमेदवाराला चमको नेत्यांनी आपल्या ताब्यात घेतल्याने त्यांना अनेकांपर्यंत पोहोचता येणे अशक्य आहे. काही पदाधिकार्‍यांनी तर प्रचारासाठी चारचाकी गाड्या मिळाल्याशिवाय बाहेर पडायचे नाही असा निर्णय घेतला. त्यामुळे भाजपकडे लक्ष द्यायला उमेदवाराला वेळ नाही. तथापि, मोदींसाठी कार्यकर्त्यांनी प्रचारयंत्रणा राबवण्याचा निर्णय घेतला. अशोक रागीर, सुदाम ओझा, सोमनाथ कानकाटे, सीताराम मोहरीकर, राजेंद्र सांगळे आदींनी लोखंडेंचा प्रचार सुरू केला आहे.