आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

खासदार दिलीप गांधी उद्या अर्ज भरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- नगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप गांधी सोमवारी (24 मार्च) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष राजू शेट्टी उपस्थित राहतील, अशी माहिती भाजपचे शहर उपाध्यक्ष अनिल गट्टाणी यांनी दिली. अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी क्लेरा ब्रुस मैदानावर फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा होईल. सभेसाठी अभिनेते व पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्हा उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.
मंगळवारी शरद पवार पाथर्डीत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी राजीव राजळेंच्या प्रचारासाठी पाथर्डी व पारनेर तालुक्यात येणार आहेत, अशी माहिती पाथर्डी तालुकाध्यक्ष भीमराव फुंदे यांनी दिली. या दिवशी प्रताप ढाकणे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा आहे.