आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Electronic Voting Machine, Divya Marathi

संगमनेरात एक मतदान यंत्र काही काळ बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे एक इव्हीएम मशिन मतदान सुरू झाल्यानंतर काही वेळातच बंद पडले. निवडणूक कर्मचार्‍यांनी केंद्राला भेट दिल्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.सकाळी उन्हाची तीव्रता कमी असल्याने मतदान केंद्रांवर गर्दी होती. नऊनंतर ही गर्दी मंदावली. दुपारी अनेक मतदान केंद्रे ओस पडली होती. चांगला पोलिस बंदोबस्त असल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. किरकोळ तक्रारी वगळता मतदान शांततेत पार पडले.


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्नी कांचन, मुलगी सवितासह मूळ गावी जोर्वे येथे सकाळी मतदानाचा हक्क बजावला. आमदार डॉ. सुधीर तांबे व इतरांनी शहरात मतदान केले.


काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गैरहजर
शिवसेनेच्या एका पदाधिकार्‍याने जबाबदारी घेऊनही बूथ न लावल्याने शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्याची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी शहरात प्रथमच मतदान केंद्रावरील बूथवर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गैरहजेरी जाणवली. एरव्ही मोठय़ा संख्येने मतदानासाठी प्रयत्न करणारे कार्यकर्ते यावेळी शांत दिसत होते.