आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, India, Divya Marathi, Nagar

मतदानाची तयारी पूर्ण, 620 अतिरिक्त मतदान यंत्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. दोन्ही मतदारसंघांसाठी 620 अतिरिक्त मतदान यंत्रे मागवण्यात आली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी मंगळवारी दिली.
जिल्ह्यात 3 हजार 581 मतदान केंद्रे आहेत. त्यात 46 संवेदनशील व 17 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे. नगर शहरातील सहा अतिसंवेदनशील मतदान केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मतदानासाठी 3 हजार 581 मतदान यंत्रे मागवण्यात आली आहेत. 620 अतिरिक्त मतदान यंत्रे आहेत.


मतदानाच्या दिवशी उमेदवारांना 8 वाहनांची परवानगी देण्यात आली आहे. आठपेक्षा जास्त वाहनांचा वापर करताना आढळल्यास संबंधितांविरूध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. 46 मतदान केंद्रे संवेदनशील असून, तेथे सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या केंद्रांवर कॅमेर्‍यांची नजर असेल. नगर विधानसभा मतदारसंघातील 62 ते 67 या सहा मतदान केंद्रांत वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. नगर मतदारसंघासाठी 165 क्षेत्रीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर 8 हजार 869 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.