आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nagar And Shirdi Lok Sabha Constituncy, Divya Marathi

मंगळवारी थंडावणार जाहीर प्रचाराच्या तोफा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघात गुरुवारी (17 एप्रिल) मतदान होणार आहे. प्रचाराला अवघे दोन दिवस उरले असून, मंगळवारी (15 एप्रिल) संध्याकाळी पाच वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. दरम्यान, प्रशासनाने मतदानाची तयारी पूर्ण केली आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिली.
मतदानाच्या दोन दिवस अगोदर मोठय़ा प्रमाणात गैरप्रकार होतात. या पार्श्वभूमीवर तीन भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यात महसूल व पोलिस अधिकार्‍यांचा समावेश असेल.

निवडणुकीसाठी महसूल, भूसंपादन, मुद्रांक, पुरवठा, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक अशा 22 हजार कर्मचारी व अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दोन्ही मतदारसंघांत मिळून 31 लाख 19 हजार 711 मतदार आहेत. त्यात महिलांची संख्या 14 लाख 72 हजार 797 आहे. 16 लाख 46 हजार 903 पुरुष मतदार आहेत. प्रचारासाठी अवघे दोन दिवस उरल्याने रविवारी प्रमुख उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठींवर जोर देत प्रचार केला.


46 संवेदनशील केंद्रांवर कॅमेर्‍याचा वॉच
उमेदवारांकडून मतदारांना पैसे, वस्तू किंवा मद्याचे वाटप होऊ नये, यासाठी विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 46 संवेदनशील मतदान केंद्रांवर गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.’’ अनिल कवडे, जिल्हाधिकारी