आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Nagar, Divya Marathi, Police

बंदोबस्तासाठी 6 हजार पोलिस नियुक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नगर व शिर्डी मतदारसंघात 6 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मंगळवारी दिली.
बंदोबस्तासाठी जिल्ह्याबाहेरुनही अतिरिक्त पोलिस बळ मागवण्यात आले आहे. मतदानासाठी 11 पोलिस उपअधीक्षक, 3 निरीक्षक, 57 सहायक निरीक्षक, 2 हजार 300 पोलिस कर्मचारी व 1 हजार 554 होमगार्डची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर व जिल्ह्यातील 3 हजार 778 आरोपींना वॉरंट बजावण्यात आले आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नगर, संगमनेर, र्शीरामपूर, राहाता या भागात कोम्बिंग ऑपरेशन केले. अवैध मद्यविक्रीप्रकरणी 313 खटले दाखल करण्यात आले, असे शिंदे यांनी सांगितले.


जिल्ह्यातील 17 अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांबरोबरच केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कुठल्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडल्यास 15 मिनिटांत पोलिस तेथे पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या व केंद्रीय राखीव दलाच्या प्रत्येकी दोन तुकड्या मागवण्यात आल्या आहेत.
47 जणांना तडीपार करण्यात आले असून, आचारसंहितेनंतर 23 जणांना प्रत्यक्ष तडीपार करण्यात आले आहे. मतदानादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी 860 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी 83 जणांना अटक करण्यात आली आहे. 21 गावठी पिस्तुले पोलिसांनी जप्त केली आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.