आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election,Latest News In Divay Marathi,

आचारसंहिता लागू; प्रतीक्षा उमेदवारांची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या आचारसंहितेचा अंमल बुधवारपासूनच सुरू झाला. 17 एप्रिल रोजी मतदान होईल. त्यासाठी एकूण 30 लाख 38 हजार मतदार, तर 3 हजार 290 मतदान केंद्रे असतील. दरम्यान महापालिका, जिल्हा परिषदेसह सर्व राजकीय लाभाच्या पदावर असलेल्या व्यक्तींची शासकीय वाहने काढून घेण्यात आली आहेत. प्रशासकीय पातळीवर आचारसंहिता लागली असली तरी आम आदमी व डेमोक्रॅटिक पार्टी वगळता कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार जाहीर न केल्याने उमेदवारांची उत्सुकता लागून राहिली आहे.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून सोलापूर जिल्ह्यातील माढा व सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. बुधवार दि. 5 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्याने जिल्ह्यातील सर्व अधिकारी व विभागप्रमुखांना सूचना दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली.
पथ्ये आणि नियोजन
विनापरवाना डिजिटल फलक काढून टाकावेत.
शासकीय विर्शामगृहाचा राजकीय पक्षांना वापर करता येणार नाही.
शस्त्र जमा करण्याविषयी स्वतंत्र आदेश काढणार
खर्चासाठी उमेदवारांना बँक खाते उघडावे लागेल
20 हजार रुपयांपर्यंतचे होतील रोख व्यवहार
26 मार्चपर्यंत करता येईल तहसील कार्यालयात मतदार नावनोंदणी
निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी जि.प.च्या ‘कॅफो’वर
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एक अकाउंटंट व 2 इतर अधिकारी
महापालिकेने अंदाजपत्रक मंजूर न केल्याने ते रखडले, आता प्रशासकीय खर्चच राहणार
सोलापूरसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम तर माढय़ासाठी अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे निवडणूक अधिकारी असतील.