आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकांना व्यवसायासाठी कर्ज देऊ, आमदार शिवाजी कर्डिले यांचे आश्वासन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सर्वांच्या सहकार्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या जिल्हा बँकेच्या संचालकपदी माझी बिनविरोध निवड होऊ शकली. बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांचा विकास साधण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला. पुढील काळात युवकांना व्यवसाय, उद्योगासाठी बँकेकडून कर्जरूपी मदत देण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासन आमदार शिवाजी कर्डिले यांनी दिले.
जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कर्डिले यांचा बुऱ्हाणनगर येथे नागरी सत्कार करण्यात आला त्या वेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. माजी आमदार दादा कळमकर यांच्या हस्ते कर्डिले यांचा सत्कार झाला. आमदार अरुण जगताप, उपमहापौर सुवर्णा कोतकर, बाजार समितीचे सभापती हरिभाऊ कर्डिले, विनायक देशमुख, संपत म्हस्के, रावसाहेब शेळके, जयंत वाघ, शरद दळवी, नगरसेवक सुवेंद्र गांधी, रघुनाथ झिने, बाजीराव हजारे, नारायण आव्हाड, अनिल करांडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

कर्डिले म्हणाले, मला राजकारणातून संपवण्याचा डाव राजकीय पुढाऱ्यांनीच आखला होता. खोट्या गुन्ह्यात माझे नाव गोवण्यात आले. सुरेश जैन यांनाही खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे राजकारण संपवण्याचे काम याच पुढाऱ्यांनी केले. जनतेच्या प्रश्नांना कायम प्राधान्य दिल्याने जनता माझ्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी अर्ज भरल्यानंतर विरोधात एकही अर्ज येण्याची राज्यात आतापर्यंत घडलेली घटना नगर तालुका मतदारसंघात घडली. हीच माझ्या कामाची पावती आहे.