आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विळदमध्‍ये अट्टल दरोडेखोरांची टोळी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद करण्यात लोहमार्ग पोलिसांना मंगळवारी (9 एप्रिल) यश आले. विळद रेल्वेस्थानकावर पाचजणांना अटक करण्यात आली. उर्वरित 6 दरोडेखोर मात्र पसार झाले.
कृष्णा भरतलाल यादव (24, चक्रपाणी वसाहत, पांडवनगर, गव्हाणी चाळ, भोसरी, पुणे), विकास सीताराम दराडे (36, पानेगाव, ता. अंबड, जि. जालना), किरण प्रकाश जाधव (26, खडकवाडी, ता. पारनेर, नगर), अविनाश प्रकाश जाधव ऊर्फ हावड्या (19, खडकवाडी, पारनेर), संदीप दादाराव ठोकळ (25, धाकली, जि. अकोला) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांची चाहूल लागताच दरोडेखोरांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, तथापि पोलिसांनी पाठलाग करून पाचजणांना पकडले. त्यांच्याकडून 12 हजार 800 रुपये, चार मोबाइल, सत्तूर, चाकू, दोरी, मिरची पूड व लोखंडी रॉड जप्त करण्यात आला.