आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारो युवकांनी घेतली देशात रामराज्य आणण्याची शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- हिंदूराष्ट्र सेना भारतीय जनता पक्षाच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या सांगताप्रसंगी खासदार दिलीप गांधी यांनी उपस्थित हजारो युवकांना देशात रामराज्य आणण्यासाठी योगदान देण्याची शपथ दिली. युवकांनी त्यास चांगला प्रतिसाद दिली. 
 
खासदार गांधी यांच्या हस्ते माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून रामनवमी मिरवणुकीस सुरुवात झाली. पंचपीर चावडी, जुना बाजार, चर्च रोड, माणिक चौक, कापडबाजार, तेलीखुंट, चितळे रसेतै, चौपाटी कारंजामार्गे ही मिरवणूक दिल्ली दरवाजा येथे आल्यानंतर तिची सांगता झाली. 
 
यावेळी युवकांना उद्देशून खासदार गांधी म्हणाले, मोठ्या प्रमाणात युवक या मिरवणुकीत सहभागी झाल्याने शहरात एकत्मातेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रभू रामचंद्रांनी जसा आदर्श राज्य कारभार करून सर्वत्र सुख-शांत-समृद्धी आणून रामराज्य निर्माण केले होते, तसे रामराज्य पुन्हा येण्यासाठी सर्व युवकांनी पुढे येणे आवश्यक आहे. नुसते म्हणून रामराज्य येणार नाही, तर त्यासाठी आपण सर्वजण स्वच्छता, भ्रष्टाचार निर्मूलन, सुशासन, पर्यावरण संतूलन राखून प्रमाणिकपणे काम करण्याची शपथ घेऊ या प्रत्यक्ष अंमलबजावणी करू. 
 
पुढील वर्षी रामनवमीची मिरवणूक यापेक्षा अधिक जोरात काढण्यात येईल, असे सांगत पोलिस प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल खासदार गांधी यांनी आभार मानले. यावेळी उपमहापौर श्रीपाद छिंदम, नगरसेवक सुवेंद्र गांधी, भाजप सरचिटणीस किशोर बोरा, हिंदू राष्ट्र सेनेचे सागर ठोंबरे, परेश खराडे आदींसह भाजपचे पदाधिकारी, नगरसेवक हिंदू राष्ट्र सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...