आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर : नेवाशात पार पडला पहिला रिंगण सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवगडच्या दिंडीचा नेवासे येथे रविवारी मोठ्या उत्साहात झालेला रिंगण सोहळा. - Divya Marathi
देवगडच्या दिंडीचा नेवासे येथे रविवारी मोठ्या उत्साहात झालेला रिंगण सोहळा.
नेवासे : महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचा पहिला रिंगण सोहळा रविवारी हरिनामाच्या गजरात पार पडला. देवगड देवस्थानची दिंडी हा महाराष्ट्राच्या कौतुकाचा विषय आहे. शिस्तप्रिय असलेली ही दिंडी वैभवसंपन्न दिंडी मानली जाते. गेली ४७ वर्षे या दिंडीचा नेवाशातील ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीतील रिंगण सोहळा हा महाराष्ट्रातील पहिला रिंगण सोहळा म्हणून प्रसिद्ध आहे. 
 
देवगडहून निघालेल्या दिंडीचे रविवारी दुपारी नेवाशात आगमन झाले. नळकांडे मळ्यात दुपारचे भोजन घेतल्यानंतर पुन्हा एकदा शिस्तीने निघालेल्या या दिंडीचे जागोजागी स्वागत झाले. दुपारी दोन वाजता सजवलेल्या नेवासे बसआगारात दिंडी आली. त्यावेळी फटक्याची आतषबाजीत दिंडीचे स्वागत करण्यात आले. रिंगण सोहळ्यात प्रथम मानाच्या घोड्यासह झेंडेकरी, टाळकरी नंतर वारकरी यांचे रिंगण झाले. एसटी अधिकारी कर्मचाऱ्यांचेदेखील रिंगण झाले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिणीचे रूप घेतले होते. तेदेखील रिंगणात सामील झाले. भास्करगिरी महाराजांचे आशीर्वादपर भाषण झाले. 
 
जसजसा रिंगण सोहळा रंगत येत होता, तसतसा हरिनामाचा गजर मोठा होत होता. सभापती सुनीता गडाख यांनी दिंडीचे पूजन केले. आमदार बाळासाहेब मुरकुटे, तहसीलदार ज्योतीप्रकाश जायकर, प्रदीप पाठक, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, एसटीचे विभागीय आगारप्रमुख उदय पाटील, आगारप्रमुख सुरेश देवकर, भावी नगराध्यक्ष संगीता बर्डे सर्व नगरसेवक उपस्थित होते. दूधविक्रेते बागवान यांच्यातर्फे पाणी चहा वाटप झाले. मोहिनीराजाचे दर्शन घेतल्यानंतर मुथ्था परिवाराकडून अल्पोपाहार देण्यात आला. रात्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये दिंडी मुक्कामी होती. 
 
दिंडीचे फटाके फोडून स्वागत 
रविवारी दिंडीसाठी संपूर्ण नेवासे शहर सजले होते. रिंगण सोहळ्यानंतर दिंडी नेवासे शहरात दाखल झाली. आठवडे बाजार असतानाही बाजारकरूंनी अर्धा मार्ग मोकळा ठेवला होता. नगर पंचायत चौकामध्ये पुन्हा नवनिर्वाचित भावी नगराध्यक्ष संगीता बर्डे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते. ठिकठिकाणी फटाके फोडून फुले उधळून दिंडीचे स्वागत होत होते. 
बातम्या आणखी आहेत...