आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जखमी तरुणावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - गेल्या महिन्यात विधी महाविद्यालयाजवळ झालेल्या गोळीबार प्रकरणाला बुधवारी वेगळे वळण मिळाले. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणावरच अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोघा आरोपींबरोबर तक्रारदार तरुणीही काही दिवसांपासून अटकेत आहे. गुन्ह्याची प्रमुख सूत्रधार असलेल्या तरुणीने अत्याचाराची फिर्याद दाखल केल्याने नवा पेच निर्माण झाला.
दीपक रंगनाथ दुसाने याच्यावर मोटारसायकलीवरुन आलेल्या दोघांनी चार गोळ्या झाडल्याची घटना २१ ऑक्टोबरला घडली. जखमी अवस्थेत दीपकला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका तरुणीच्या सांगण्यावरुन आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली. मात्र, संबंधित तरुणी गर्भवती असल्याने पोलिसांनी तिला अटक करण्याचे टाळले. पोलिसांनी खोलात जात तपास केल्यावर धक्कादायक माहिती समोर आली. या गुन्ह्याची सूत्रधारच संबंधित तरुणी असल्याचे पुढे आल्याने तीन दिवसांपूर्वी तिला अटक करण्यात आली. संबंधीत तरुणीने पोलिसांकडे बुधवारी तक्रार देत दीपक दुसाने (मालदाडरोड) याने लग्नाचे अामिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करत वारंवार आपल्यावर त्याच्या राहत्या घरी मालदाडरोड येथे आणि डोंगरगाव (ता. अकोले) येथे अत्याचार केल्याचे सांगितले. शारीरिक संबंधातून गर्भवती राहिल्याची कल्पना तिने दीपकला दिली असता त्याने बाळ ठेवण्यास नकार देत गर्भपात करण्यास सांगितले. घरी आल्यास संपवून टाकण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी दुसानेविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला.
बातम्या आणखी आहेत...