आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई संस्थानच्या प्रसादालयात निकृष्ट तांदूळ, चाैघांना नाेटीस, तक्रारीनंतर प्रकार बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - साईबाबा संस्थानमधील निकृष्ट तूप खरेदी प्रकरण गाजत असताना, आता प्रसादालयातील तांदळामध्ये अळ्या, जाळे, भुंगे, कीडे आढळून अाले हाेते. हा निकृष्ट तांदूळ वापरणे संस्थानने बंद केले असून त्याचे गाेदामही सील करण्यात अाले अाहे. या प्रकरणी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

संस्थानच्या गाेदामात १७९३ क्विंटल तर उपभांडारात ८१ क्विंटल निकृष्ट तांदूळ आढळून आला आहे. त्यात कीडे, जाळे, अळ्या, भुंगे असल्याची माहिती राजेंद्र जाधव यांनी प्रसादालयाचे वरिष्ठ अधिकारी रामराव शेळके यांनी दिली. त्यानंतर हा तांदूळ वापरणे बंद करण्यात अाले.
संस्थानच्या वतीने सोना, मसूरी या ब्रँडचा हा तांदूळ नांदेडच्या व्यापाऱ्यांकडू खरेदी करण्यात अाला हाेता. मात्र या तांदळाच्या गोण्यांवर कोणत्याही ब्रँडचे चिन्ह नव्हते. निकृष्ट प्रतिचा हा तांदूळ खरेदी करण्यामागे नेमके गौडबंगाल काय? याची चाैकशी केली जात अाहे.