आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी अंगी शिस्त आवश्यक...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नुसतीच मोठी स्वप्ने न पाहता ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रत्येकाने आपल्या अंगी शिस्त बाणावी. अभ्यासात सातत्यही आवश्यक आहे, असे एल अँड टी कंपनीचे सहसरव्यवस्थापक अरविंद पारगावकर यांनी सांगितले.
एल अँड टी कंपनीतील कर्मचारी व अधिकार्‍यांच्या पाल्यांनी 10 वी व 12 वीमध्ये विशेष गुणवत्ता मिळवलेल्या 18 विद्यार्थी-विद्यार्थिनींचा विशेष सन्मान करण्यात आला. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 153 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नगरच्या हृषीकेश पत्की यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख नागेशचंद्र आढाव यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील उद्देश स्पष्ट केला. पत्की याचा पारगावकर यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

पारगावकर म्हणाले, सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे सर्वांनी वेळेचे महत्त्व समजून घ्यावे. नवनवीन तंत्रज्ञान आवगत करावे. निर्धार व आत्मविश्वास वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल. हृषीकेशने यूपीएससी परीक्षेत देशात 153 व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नगरचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकवले आहे. त्याचा आदर्श व मार्गदर्शनही घ्यावे, असे सांगून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कंपनीचे अधिकारी महेश चांडक, अविनाश मांडे, आशुतोष कोल्हटकर, डॉ. अनघा पारगावकर, संजोग महाजन, युनियनचे अध्यक्ष किरण देशमुख यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात स्कायरवी रेड्डी, अनुष्का चांडक, प्रतीक कुलकर्णी, असीम अपस्तंभ, मयूरी निक्रड, श्रेया कुलकर्णी, श्रुती सारवणकर, पूजा ठोकळ, शुभम संवत्सरकर, चिन्मय भट, सचिन गुलदगड, हृषीकेश वाळके, मृणाल भावसार, अनिशा कोल्हटकर, हर्षदा पांढरे, अदिती चिमणपुरे, शुभम काळे, गौरव नागापुरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नागेशचंद्र आढाव, ईश्वर हांडे, स्वप्निल ओस्तवाल, दीपाली टकले, आर. एन. कुताळ व सहकाºयांनी परिश्रम घेतले.