आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दिव्य मराठी' लकी ड्रॉमध्ये अनिता ससे ठरल्या मोटारसायकलीच्या मानकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दिव्य मराठीच्या वार्षिक बुकिंग योजनेंतर्गत लकी ड्रॉची सोडत सोमवारी काढण्यात आली. प्रथम क्रमांकाचे मोटारसायकलीचे बक्षीस पाइपलाइन रस्ता येथील अनिता पाराजी ससे यांना मिळाले. इतर 152 वाचकांना लाखोंची बक्षिसे मिळाली.
"दिव्य मराठी'ने नगरच्या सामाजिक व सांस्कृतिक वाटचालीत भरीव योगदान दिले आहे. त्याबरोबरच परखड आणि नि:पक्ष वार्तांकन करून अल्पावधीतच वाचकांचा विश्वास कमावला आहे. "दिव्य मराठी'च्या वतीने वार्षिक बुकिंग योजनेंतर्गत लकी ड्रॉच्या माध्यमातून लाखोंच्या बक्षिसांचे वाटप केले जाते. सोमवारी "दिव्य मराठी' कार्यालयात आयएमएसचे सरसंचालक डॉ. शरद कोलते, "कोहिनूर'चे संचालक प्रदीप गांधी, प्राचार्य डॉ. राजकुमार देशपांडे, शिल्पकार प्रमोद कांबळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सुनील गिते यांच्या हस्ते लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. पाइपलाइन रोड येथील अनिता पाराजी ससे यांना मोटारसायकलीचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मोटारसायकलीची चावी कांबळे यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली. यावेळी ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे, जाहिरात उपव्यवस्थापक नीलेश सोनवणे, मुख्य वितरक साहेबराव भोसले, प्रयास ग्रूपच्या अलका मुंदडा, सुनील जोशी, शरद बेरड, अशोक भागवत, प्रमोद पंतम, शिवाजी काळदाते, बबन धलपे, बाबा दुसुंगे आदी उपस्थित होते.
बाजीराव शिंदे व नितीन कातोरे यांना टीव्ही, दिनेश तांबे व एस. ए. गायकवाड यांना फ्रीज, तर जगन्नाथ क्षीरसागर, प्रमोद शिंदे यांना इंडक्शन स्टोव्ह मिळाला. इतर लकी वाचकांना 10 पंखे, 10 प्रेशर कुकर, 125 फ्राय पॅन मिळाले. लवकर बक्षिसांचे वितरण व उर्वरित विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतील, असे जिल्हा वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड यांनी सांगितले.
बक्षीस मिळाल्याचा आनंद वेगळाच
पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याचे फोनवरून समजताच अत्यानंद झाला. हे स्वप्न की सत्य हेच समजत नव्हते. 'दिव्य मराठी'च्या कार्यालयात गेल्यानंतर खात्री पटली. "दिव्य मराठी'च्या वतीने राबवण्यात येणारे विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत.'' अनिता ससे, पहिल्या बक्षिसाच्या मानकरी.