आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मढी देवस्थान ट्रस्टतर्फे विकासकामांना गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- मढी देवस्थान ट्रस्टतर्फे दर्शनबारीच्या जोडपुलावर सावलीसाठी शेड व रंगरंगोटीचे काम सुरू आहे. भविष्यकालीन विकास आराखडा व यात्रा आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष सचिन मरकड व कोषाध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली.
कानिफनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. भाविकांनी दान केलेल्या दागिन्यांतून चांदीच्या 25 किलोंच्या विटा, 25 तोळे सोन्याची बिस्किटे व पाच तोळे सोन्याचा मुकुट तयार करण्यात आला. आजीवन अन्नदान योजनेसाठीचा निधी बँकेत गुंतवण्यात आल्याची माहिती पवार व मरकड यांनी दिली.