आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhukar Picada Question Of The Proper Planting Guardian Assurance

प्रश्न मार्गी लावण्याचे पालकमंत्री मधुकर पिचड यांचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर -नगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील बहुचर्चित उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रविवारी (19 जानेवारी) सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पिचड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, खासदार दिलीप गांधी व भाऊसाहेब वाकचौरे, आमदार राम शिंदे, शिवाजी कर्डिले, भाऊसाहेब कांबळे, अरुण जगताप, चंद्रशेखर घुले, विजय औटी व बबनराव पाचपुते आदी यावेळी उपस्थित होते.

बैठकीत खासदार वाकचौरे यांनी शिर्डी बाह्यवळण रस्त्याचे काम सुरू करण्याबाबत मुद्दा उपस्थित केला. नंतर खासदार गांधी यांनी नगर शहरातील रखडलेल्या उड्डाणपुलाबाबत नाराजी व्यक्त करून याआधीचे पालकमंत्री पाचपुते यांनी भूमिपूजन केलेल्या या पुलाचे काम सुरू का होत नाही, हा संशोधनाचा विषय असल्याचे सांगितले. नगर-दौंड रस्त्याच्या दुहेरीकरणाच्या प्रस्तावाच्या निविदा का काढल्या जात नाहीत, दहा वर्षांत जिल्ह्यात एकही नवा रस्ता का झाला नाही, असे प्रश्न त्यांनी बैठकीत उपस्थित केले.

आमदार कर्डिले म्हणाले, उड्डाणपुलाच्या कामात केवळ कालव्यय होत आहे. हा प्रश्न न सुटल्यास आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक खैरे यांनी केडगाव भुयारी मार्गाला स्थानिक मशीद व मंदिरामुळे विरोध होत असून त्यामुळे स्टेशन रस्त्यावरील उड्डाणपूल रखडला आहे. हे काम नवीन ठेकेदाराला बीओटी तत्त्वावर देण्यात येणार आहे, असे सांगितले.

नारायणगव्हाण बाह्यवळण रस्त्यालाही स्थानिकांचा विरोध असल्याचे खैरे यांनी सांगताच खासदार गांधी यांनी ‘‘तुम्ही खोटे बोलत आहात,’’असे म्हणत त्यांना झापले. आमदार औटी म्हणाले, रस्ता पूर्ण झालेला नसताना टोलवसुलीचा अधिकार शासनाला आहे का? त्यावर खैरे म्हणाले, तो निर्णय शासनाचा आहे. यावर औटी म्हणाले, सध्या राजवट कुणाची आहे?

वाकचौरे यांनी जिल्ह्यातील सर्व टोलनाके बंद करण्याची मागणी केली. यावर पिचड म्हणाले, टोलवसुलीचा प्रकार चुकीचा आहे. नगर येथील उड्डाणपूल व अन्य विषयांबाबत चर्चा करण्यासाठी रविवारी बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ यांनी सीनानदीत सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे लक्ष वेधले. त्यावर महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता परिमल निकम म्हणाले, शहरातील मैलामिर्शित पाणी बाहेर सोडण्यासाठीचा प्रकल्प बंद आहे. भुयारी गटार योजनेंतर्गत नवा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.


उड्डाणपुलाबाबत उद्या बैठक

कोल्हार पुलावरून रंगला हास्यविनोद
खासदार वाकचौरे यांनी कोल्हार येथील पुलासाठी कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही, याकडे लक्ष वेधले. हा पूल पडतो की काय, असे तेथून जाताना वाटते. हा पूल खाली-वर होतो या त्यांच्या वक्तव्यावर सभागृहात चांगलाच हशा पिकला.

कॅग काय फाशी देणार आहे का?


जामखेडच्या वसतिगृहासाठीचा निधी नियोजनच्या चुकीमुळे परत जाईल. कॅगमध्ये हे मुद्दे उपस्थित होतील, असे आमदार शिंदे म्हणताच पिचडांनी ‘‘कॅगला उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत. कॅग काय फाशी देणार आहे का?’’ असा उलटप्र