आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे राजकीय कार्य संपले : पिचड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिंडोरीतून लोकसभा निवडणूक लढवावी, असा आग्रह छगन भुजबळ यांनी माझ्याकडे धरला होता. पक्षाध्यक्षांनीही मला तशी सूचना केली होती. मात्र, मी स्वत: लोकसभेसाठी नकार दिला. नवीन पिढीला संधी दिली गेली पाहिजे. आता माझे राजकीय कार्य संपले, असे सांगत पालकमंत्री मधुकर पिचड यांनी आपल्या राजकीय निवृत्तीचे संकेत गुरुवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना पिचड म्हणाले, लोकसभेच्या जागांबाबत येत्या रविवारी (23 फेब्रुवारी) मुंबईत बैठक होणार आहे. नंतर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. नगरमधून माजी पालकमंत्री बबनराव पाचपुते इच्छुक आहेत का, असे विचारले असता पिचड म्हणाले, उमेदवारी देण्याबाबतचे सर्व अधिकार पक्षाध्यक्ष शरद पवार यांना देण्यात आले आहेत. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, माजी आमदार जयंत ससाणे व खासदार भाऊसाहेब वाकचौरे दोन दिवसांपूर्वीच मला भेटायला आले होते. वाकचौरे यांना राष्ट्रवादी मदत करणार नाही, हा आरोप खोडून काढत जो निर्णय पक्ष घेईल तो मला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार प्रामाणिकपणे करेल. जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. लोकसभेसाठी मी स्वत: नकार दिला, असे ते म्हणाले.