आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhukar Pichad News In Marathi, Nagar Gurdian Minister, Divya Marathi

शेतकरी उभा राहण्यासाठी प्रयत्न करू - मधुकर पिचड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले - अस्मानी संकटात सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहील. निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन नुकसान भरपाई देऊन शेतकर्‍याला उभा राहण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शनिवारी (15 मार्च) दिली.


पिचड यांनी आढळा परिसरातील वीरगाव, देवठाण, सावरगाव, समशेरपूर या गावांतील गारपिटीने उद्ध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी केली. गंगाधर विठोबा तोरकड या शेतकर्‍याच्या शेतावर पत्रकारांशी ते बोलत होते. शेतकर्‍यांना दिलासा देत वडीलकीच्या नात्याने मी स्वत: तुमच्या पाठीशी उभा राहीन, असे त्यांनी सांगितले. पंचनाम्यांबाबत संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. बँकेचे व्याज, वीज बिल माफी, कर्जमाफी या शेतकर्‍यांच्या सूचनांची अंमलबजावणीसाठी प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. या वेळी सीताराम गायकर, वैभव पिचड, गिरजाजी जाधव, मीनानाथ पांडे, कैलास वाकचौरे, अंजना बोंबले, जि.प. सदस्य परबत नाईकवाडी आदी उपस्थित होते.