आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhukar Pichad News In Marathi, Nationalist Congress, Newasa

भूलथापांना बळी पडू नका, जातीयवादी पक्षांना दूर ठेवा; मधुकर पिचड यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे - बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शरद पवार यांची शिष्टाई चालते. त्यामुळे पवारांवर टीका करण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. चुकीच्या माणसाच्या हातात सत्ता गेल्यास देशाचा गुजरात होईल. विरोधकांच्या या नीतीच्या प्रचाराला थारा न देता चुकीच्या मार्गाला जाऊ नका. जातीयवादी पक्षांना दूर ठेवा, असे आवाहन पालकमंत्री मधुकर पिचड यांनी केले.


नेवासे येथे आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रचार सभेत पिचड बोलत होते. या वेळी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, विठ्ठल लंघे, आमदार शंकरराव गडाख, आमदार सुधीर तांबे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे, सोमनाथ धूत, माजी आमदार पांडुरंग अभंग आदी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, मोदी लाट हा मीडियाने फुगवलेला फुगा आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. आघाडी शासनाने केंद्रात व राज्यात भरीव कामे केली आहेत. ही कामे कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन केले. आमदार गडाख म्हणाले, कितीही अपप्रचार झाला, तरी तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे यांचासह तालुक्यात प्रचार करणार आहे. या बाबींवर जिल्हाध्यक्ष ससाणे यांनी लक्ष द्यावे.


मंत्री विखे म्हणाले, स्थानिक संघर्ष बाजूला ठेवून एकदिलाने कामे करा. जिल्ह्यातील दोन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. या वेळी आमदार गडाख, वाकचौरे, ससाणे, शेलार, लंघे, अभंग, भय्यासाहेब देशमुख, नाना तुवर यांची भाषणे झाली. पी. आर. जाधव व अँड. कारभारी वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समिती सभापती कारभारी जावळे यांनी आभार मानले.


पाणीप्रश्नावर एकत्र या
उत्तरेत तीनही धरणांच्या टेलला असलेल्या नेवासे तालुक्यावर नेहमी अन्याय होतो. समान पाणी वाटपाचा कायदा आला आहे. मराठवाड्याप्रमाणेच नगर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी पाणी प्रश्नावर येण्याचे आवाहन आमदार गडाख यांनी केले.