आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार करा : पिचड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड - आगामी लोकसभा निवडणुकीत नगरची जागा सर्वस्व पणाला लावून जिंकायची आहे. त्यादृष्टीने कामाला लागण्याच्या सूचना आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी रविवारी दिल्या.

जामखेड येथील महावीर मंगल कार्यालयात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पिचड बोलत होते. जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार अध्यक्षस्थानी होते. माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी आमदार राजीव राजळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे, बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, दत्तात्रेय वारे, शहाजी राळेभात, उपसभापती दीपक पवार यावेळी उपस्थित होते.

बन्सीलाल कोठारी, सुभाष कोठारी, साहेबराव पाटील, गोपाळराव सोले यांच्यासह बाबासाहेब पवार, मन्सूरभाई या जुन्या सहकार्‍यांबरोबर मी काम केले आहे. तालुक्यातील प्रलंबित प्रo्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सोडवू, अशी ग्वाही पिचड यांनी दिली.

पाचपुते म्हणाले, मंत्रिपद गेल्याने मला राग येण्याचे काहीही कारण नाही. जिल्ह्यात पक्ष संघटना बांधण्यासाठी मी काम करणार आहे. लोकसभेची उमेदवारी कोणालाही मिळो, मी बंडखोरी करणार नाही. मागील लोकसभेला पक्षाचा उमेदवार कोणामुळे पडला हे सर्वांना माहिती आहे. कुठलीही निवडणूक लढवण्याअगोदर कामाचे नियोजन महत्त्वाचे असते. ते माझ्याकडे आहे. काहींच्या डोक्यात असेल की, घबाड मिळाले आहे. असे काही समजू नका. व्यासपीठावर शेलार व राजळे हे आपसात बोलत होते. त्यावर पाचपुते यांनी भाषण थांबवून आपल्याला ऐकायचे नसेल, तर थांबतो, असा इशारा दिला. उपस्थितांत याची उलटसुलट चर्चा सुरू होती.