आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चंद्रसरीं' त न्हाली 'मधुरिमा'ची संध्याकाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- "निंबोणीच्या झाडामागे', "उगवला चंद्र पुनवेचा',"शुक्रतारा मंदवारा'पासून "कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर'सारख्या चंद्रगीतांच्या शीतल सूरसरींत नगरचे श्रोते चिंब झाले. निमित्त होते ह्यिदव्य मराठीह्णच्या मधुरिमा क्लबह्णया महिलांसाठी नगरमध्ये सुरू झालेल्या उपक्रमाच्या औपचारिक उद्घाटनाचे. रंगश्रुती म्युझिक या मुंबईतील कलाकारांच्या ग्रूपने कोजागरी पौर्णिमेनिमित्त अत्यंत बहारदार असा चंद्रगीतांचा कार्यक्रम सादर केला.
यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात आयोजित या उपक्रमाचे उद्घाटन गायक श्रीरंग भावे, विद्या करलगीकर, श्रृती भावे-पाध्ये, "दिव्य मराठी'चे सरव्यवस्थापक शैलेश पाटील, सहप्रायोजक धस मसाल्याचे विशाल कुटे, ईन्स्टाग्रेडिएटसचे अभिजित तिटकारे, ब्युरो चिफ मिलिंद बेंडाळे, व्यवस्थापक नीलेश सोनवणे, वितरण व्यवस्थापक प्रमोद गायकवाड, चिफ मॅनेजर विकास लोळगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीरंग भावे व विद्या करलगीकर यांनी गजानन वाटवे लिखित "गगनी उगवला सांयतारा' हे गीत सादर केले. या गीताला अर्चिच लेले (तबला), पंकज धोपावकर (रिदम), वरद कठापूरकर (बासरी), श्रृती भावे-पाध्ये (व्हायोलिन) व सागर साठे (किबोर्ड) यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दीपाली केळकर यांनी चुटकुले सांगत कार्यक्रमाची खुमारी वाढवली. श्रीरंग भावे व विद्या करलगीकर यांच्या भावोत्कट गायनाने हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. महिला रसिकांनी त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. श्रीरंग भावे व विद्या करलगीकर यांनी निंबोणीच्या झाडामागे, रात्रीस खेळ चाले, शुक्रतारा मंद वारा, शारद सुंदर, चंदेरी राती, चांदण्या मागे फिरताना, धरला माझा हात, तोच चंद्रमा नभात, चांदणे शिंपीत जा, धुंद मधुमनी घुमते, हजार वेळा तुला पाहिले, चंद्र आहे साक्षीला, उगवला चंद्र पुनवेचा, नवीन आज चंद्रमा, नवीन आज यामिनी, आज चांदणे उन्हात हसते ही मराठी गीते सादर केली. या गीतांना अन्य कलाकारांनी साथ दिली. मराठी गीतांनंतर हिंदी गीतांचा कार्यक्रम झाला. श्रीरंग भावे व विद्या करलगीकर यांनी सलग चौदावी का चाँद, ओ चाँद खिला, ए चाँद का रोशन चेहरा, आधा है चंद्रमा, रात आधी ही गीते सादर केली.
मराठी व हिंदीत सादर करण्यात आलेल्या प्रत्येक गीताला रसिकांनी जोरदार टाळ्या वाजवून दाद दिली. या मैफलीचा शेवट अशोक परांजपे लिखित कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर या गीताने झाला. त्याला रसिकांनी जोरदार प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक िशवशंकर भंडारी व नितीन शिंगवी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व कलाकारांचा "दिव्य मराठी'च्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती. गौरी जोशी यांनी प्रास्ताविक केले, तर आभार बेंडाळे यांनी मानले.

देशी-विदेशी वाद्याचा साधला सुरेख संगम
चंद्रसरी या मराठी-हिंदी गीतांच्या कार्यक्रमात कलाकारांनी देशी-विदेशी वाद्यांचा अतिशय सुरेख वापर केला. तबला, ढोलकी, व्हायोलिन व बासरी ही देशी वाद्ये, तर ऑक्टोपॅड, किबोर्ड हे विदेशी वाद्ये होते. देशी आणि पाश्चिमात्य वाद्यांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली. कलाकारांनी सादर केलेल्या मधुर गीतांनी रसिकांना खिळवून ठेवले.कार्यक्रम संपल्याचे जाहीर केल्यानंतरही अनेक रसिक बसूनच होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेकांनी नंतर कलाकार व संयोजकांना भेटून चांगला कार्यक्रम दिल्याबद्दल आभार मानले.