आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Magai Pan Favorites For Nagar's People, Divya Marathi

चॉकलेट अन् मलई मगई पानांना नगरकरांची वाढतेय पसंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भरपेट जेवण झाल्यावर आठवण होते ती विड्याच्या पानाची. विडा खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. काहींना नागवेलीच्या पानाचा साधा विडा खाण्याची सवय आहे, काहींना तंबाखूयुक्त विडा, तर काहींना मसाला पानाचा विडा खाण्याची सवय असते. हल्ली नगरकरांमध्ये चॉकलेट आणि मलई मगई पानांना विशेष पसंती असल्याचे दिसून येत आहे. पाचशेहून अधिक पान दुकानांमध्ये दिवसभरात सरासरी 300 पानांची विक्री होते.

नगरमध्ये पानाची अनेक जुनी व नवी दुकाने आहेत. नुसती विड्याची पाने विकणार्‍यांमध्ये काही घराणी आजही तग धरुन आहेत. शहरात नावे घेता येतील, अशी बरीच पान दुकाने आहेत. पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे फारशी नसल्यामुळे आजी-आजोबा नाहीत. त्यांचा खलबत्ता, पिंकदाणी, चंची, अडकित्ते हे शब्दही आता नाहिसे झाल्यासारखे आहेत. परंतु, पानांची दुकाने व टपर्‍या मोठय़ा संख्येने आहेत. शहरात जवळपास दीड हजारांहून अधिक पानांची दुकाने व टपर्‍या आहेत. यापैकी दोनशेहून अधिक ठिकाणी दिवसभरात दोनशेहून अधिक पानांची विक्री होते.

चॉकलेट, मलई मगई पान, गुलकंद गोळा सारखे विविध प्रकारच्या आठ प्रकारची पाने बाजारात उपलब्ध आहेत. चॉकलेट व मलई मगई पानांना नगरकरांची विशेष मागणी आहे. चॉकलेट पानाला लहान मुले व महिला वर्गामधून चांगली मागणी आहे. तर मलई मगई पानाला सर्व वर्गाकडून व विशेषत: ग्रुप पार्टीमधुन चांगला प्रतिसाद आहे. मगई पान हे मुंबईतून नगरच्या होलसेल बाजारात येते. तेथून किरकोळ विक्रेते पान विकत घेतात.

मसाला पान चॉकलेट लिक्वीडमध्ये बुडवून चॉकलेट पान तयार केले जाते. ते फ्रिजरला ठेवल्याने त्याचा स्वाद चांगला लागतो. मगई पानाला दुधाची मलईमध्ये बुडवून मलई मगई पान बनवले जाते. गुलकंद गोळामध्ये गुलकंद, खोबरे व पानातले मसाले वापरले जातात. या पानांव्यतिरिक्त ‘माउथ फ्रेशनर’साठी ‘रामप्यारी पान’ ग्राहक घेतात. ‘फुलचंद’ पानाचा स्वाद हा खट्टामीठा पानासारखा लागतो. चॉकलेट पानाची किंमत वीस रुपये आहे.

मलई मगई पानाची किंमत वीस रुपये आहे. गुलकंद गोळा दहा रुपयांमध्ये उपलब्ध आहे. पानाचा विडा खाल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. रक्तात लोहवृद्धी होते. पण पान खाल्यानंतर पानाचा चोथा हिरड्यांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे हिरड्यांचे आजार होऊ शकतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तरीही नगरमध्ये दिवसाकाठी लाखभर रुपयांची उलाढाल पान विक्रीतून होते.

मलई-मगई पानाला ग्राहकांची सर्वाधिक पसंती
आम्ही पानांमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करतो. आमच्याकडे चॉकलेट, मलई-मगई पान, गुलकंद गोळासह विविध प्रकारचे पान मिळते. मलई-मगई पानाला ग्राहकांची सर्वात जास्त मागणी आहे. या पानाला बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांचीही मागणी असते. आमच्याशिवाय नगर शहरामध्ये हे पान कुठेच मिळत नाही. मलई-मगई पान बनवणे हे आमचे खास वैशिष्ट्य आहे. मसाला पानांमध्ये शाही गुलाब पानाला सर्वात जास्त मागणी आहे. ’’ दीपक दासी, व्ही दासी पान सेंटर, नगर.