आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महापेक्स’मध्ये नगरला तीन पदके

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात नुकत्याच झालेल्या ‘महापेक्स 2012’ या टपाल तिकिटांच्या प्रदर्शनात जामखेड येथील संग्राहक पोपटलाल हळपावत यांना ‘भारतीय शिरोवस्त्रे’ या प्रकारात रौप्यपदक, तर ‘एअरशिप्स व बलून्स’ विभागात कांस्यपदक मिळाले. नगर येथील सचिन डागा यांनाही कांस्यपदक मिळाले.
पंचवीस वर्षांनंतर हे प्रदर्शन आयोजित करण्याचा मान पुण्याला मिळाला असल्याने प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्र व गोव्यातील सुमारे 150 स्पर्धकांनी या प्रदर्शनात भाग घेतला. नगर जिल्ह्यातील हळपावत, डागा, शब्बीर शेख व चंद्रकांत पारगावकर प्रदर्शनात सहभागी झाले होते. हळपावत व डागा यांना पदके मिळून त्यांची देशपातळीवर होणा-या महापेक्ससाठी निवड झाली.
कुमार अर्बन डेव्हलपमेंटच्या संचालिका कृती जैन, परीक्षक समितीतील विस्पी दस्तूर, गोदरेज अँड वॉइस मॅन्युफॅक्चरिंगचे जॉर्ज मेनेझेस, औरंगाबाद टपाल विभागाचे टी. मुथी, आर्मी पोस्टल सर्व्हिसेसचे एम. के. खान, पुण्याचे पोस्टमास्तर जनरल के. सी. मिश्रा यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण झाले. देवल यांच्या हस्ते हळपावत यांना रौप्यपदक प्रदान करण्यात आले. हळपावत यांनी पुणेरी पगडी घालून पदक स्वीकारले. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याला दाद दिली. गेल्या काही वर्षांपासून नगर जिल्ह्यात टपाल तिकिटांचा हा संग्रह करणा-यांची संख्या वाढत असून त्यांच्यासाठी स्वतंत्र दालन उपलब्ध करण्याची गरज हळपावत यांनी व्यक्त केली.