आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Birds Friends Meeting Started In January

महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन जानेवारीमध्ये पुण्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - यंदाचे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन १७ व १८ जानेवारीला पुण्यात होणार आहे. संमेलनाचे हे २८ वे वर्ष अाहे. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील हे संमेलनाचे उद्घाटक आहेत.
ज्येष्ठ पक्षितज्ज्ञ डॉ. संजीव नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार अाहे. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ हे यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून निसर्गप्रेमी, पक्षी अभ्यासक या संमेलनात सहभागी होणार आहेत. पक्षी जगताचे विविध पैलू माहितीरुपात व सचित्र व्याख्यानांतून उलगडले जातील. असे सादरीकरण करण्याची इच्छा असणाऱ्या पक्षिमित्रांना प्रत्येकी १५ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. इच्छुकांनी विषय व थोडक्यात माहिती २ जानेवारीपर्यंत palshimitra2015@gmail.com या संकेतस्थळावर पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भाऊ काटदरे किंवाअनुज खरे यांच्याशी ९३७३६१०८१७ किंवा ८००७९७६३३७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.