आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नॅशनल क्राईममध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर गेल्याने राज्याची बदनामी : विखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- नागपूर येथील आमदार निवासात मुलीला डांबून ठेवून बलात्काराची घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी शरमेची बाब आहे. मुख्यमंत्र्यांच्याच नागपूर शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलिस प्रशासनाला अपयश आले. गृहमंत्रिपदाचा कार्यभार मुख्यमंत्र्यांकडे असतानाही कायदा सुव्यवस्था राखण्यात ते अपयशी ठरले आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री त्यांना पाठिशी घालत असल्याने नॅशनल क्राईममध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकवर गेल्याने राज्याची बदनामी झाली अाहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी रविवारी केली. 
 
राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील दरोड्यात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्यासाठी विखे शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. अस्तगाव येथील घटना अतिशय गंभीर असून या दरोड्यात एका महिलेचा झालेला मृत्यू ही दुर्दैवी बाब आहे. चोऱ्या दरोड्यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने पोलिस प्रशासनाने सतर्कता बाळण्याची गरज आहे, असे विखे म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...