आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Kesari Wrestling Tournament News In Marathi

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे भूमिपूजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने जिल्हा तालीम संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या ५८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या आखाड्याचे सुनीलगिरी महाराज व पहिलवान सदाशिव निस्ताने यांच्या हस्ते मंगळवारी भूमिपूजन करण्यात आले. २४ ते २८ डिसेंबरदरम्यान वाडिया पार्क येथील पहिलवान छबू लांडगे क्रीडानगरीत या स्पर्धा होत आहेत.
गेल्या वर्षी खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे यशस्वी आयोजन करणाऱ्या जिल्हा तालीम संघाने यावर्षी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे शिवधनुष्य पेलले आहे. दोन आठवड्यांवर आलेल्या या स्पर्धेचे आयोजन भव्य-दिव्य व यशस्वी करण्सासाठी तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे व पदाधिकाऱ्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या स्पर्धेच्या आखाड्याचे भूमिपूजन पहिलवान निस्ताने यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. नरेंद्र फिरोदिया, वैभव लांडगे, दादा कळमकर, शंकरराव घुले, विक्रमसिंह पाचपुते, धनंजय जाधव, सुभाष लोंढे, राम लोंढे, नामदेव लंगोटे, राम नळकांडे, विलास चव्हाण, राजेंद्र चोपडा, छबुराव जाधव, प्रवीण घुले, वसंतराव लकडे, दत्तात्रेय आडसुरे, एल. बी. म्हस्के,संदीप बारगुजे, कुंडलिक चिंधे, विक्रम बारवकर, रवी वाघ, गणपत खेमकर, नाना डोंगरे, युवराज आठरे, गणेश कोरडे, दीपक डावखर, पोपट काळे, दीपक सूळ, संजय झिंजे, अभिषेक भगत, जितेंद्र वल्लाकट्टी, मोहन हिरणवाळे, कैलास हुंडेकरी, श्रीकांत हेबळे, अमित गटणे, सारंग देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.