आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State 23 Co opretive Sugar Factroy In Loss

राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी थकवले 301 कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्यातील 23 सहकारी साखर कारखान्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुमारे 301 कोटी रुपये थकवले आहेत. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका सहकारी साखर कारखान्याकडे 1 कोटी 77 लाखांची थकबाकी आहे.

राज्यातील 23 सहकारी कारखान्यांनी मुंबई मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेले सुमारे 301 कोटी 89 लाख 99 हजार रुपये थकवले आहेत. कर्ज थकवलेल्या कारखान्यांमध्ये औरंगाबाद विभागातील सर्वाधिक 9 कारखाने आहेत. नागपूर विभागातील पाच कारखान्यांचा समावेश आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुका कारखान्याकडे 1 कोटी 77 लाख 15 हजारांची थकबाकी आहे. जालन्याच्या बागेश्वर कारखान्याकडे 19 कोटी 11 लाख, लातूर येथील शिवाजीराव पाटील निलंगेकर कारखान्याकडे 2 कोटी 28 लाख 77 हजार, प्रियदर्शिनी कारखान्याकडे 5 कोटी 55 लाख 29 हजार व बालाघाट कारखान्याकडे 5 कोटी 95 लाख 12 हजारांची थकबाकी आहे. बीड येथील पद्र्मशी विखे कारखान्याकडे 8 कोटी 39 लाख 41 हजार, नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा जयवंतराव पाटील कारखान्याकडे 12 कोटी 71 लाख 75 हजार, परभणी येथील नृसिंह कारखान्याकडे 35 कोटी 84 लाख 30 हजारांची थकबाकी आहे. नागपूर येथील राम गणेश गडकरी कारखान्याकडे 32 कोटी 82 लाख 50 हजार, यवतमाळमधील सुधाकरराव नाईक कारखान्याकडे 20 कोटी 2 लाख 43 हजार, अमरावतीच्या अंबादेवी कारखान्याकडे 21 कोटी 89 लाख 75 हजार, बुलढाण्यातील शिवशक्ती कारखान्याकडे 11 कोटी 71 लाख 75 हजारांची थकबाकी आहे. जळगावच्या संत मुक्ताबाई कारखान्याकडे 21 कोटी 99 लाख 68 हजार, तर नंदुरबारच्या पुष्पदंतेश्वर कारखान्याकडे 8 कोटी 20 लाख 57 हजारांची थकबाकी आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील रयत कारखान्याकडे 5 कोटी 30 लाख 83 हजार, जरंडेश्वर कारखान्याकडे 17 कोटी 93 लाख 45 हजार, सांगली येथील डोंगराई सागरेश्वर कारखान्याकडे 17 कोटी 67 लाख 96 हजार, सांगोला कारखान्याकडे 5 कोटी 70 लाख 15 हजारांची थकबाकी आहे.

माजी राष्ट्रपतींचा कारखानाही थकबाकीदारांच्या यादीत..
थकबाकी असलेले बहुतेक कारखाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आहेत. जळगाव येथील संत मुक्ताबाई कारखाना माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा आहे. लातूर येथील कारखाना काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्याकडे आहे. बीड येथील विखे कारखाना माजी मंत्री रजनी पाटील यांचा आहे. नागपूर येथील राम गणेश गडकरी कारखाना राष्ट्रवादीचे माजी मंत्री रणजित देशमुख यांचा आहे. बुलढाणा येथील शिवशक्ती कारखाना माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचा आहे. नांदेड येथील हुतात्मा जयवंतराव पाटील साखर कारखाना राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांच्याकडे आहे.

कारखान्यांची मालमत्ता जप्त करा
राज्य सहकारी बँक, मुंबई मध्यवर्ती सहकारी बँक व अन्य बँकांची हजारो कोटींची थकबाकी साखर कारखान्यांकडे आहे. राज्य सरकारने थकीत कारखान्यांची थकबाकी व्याज, मुद्दलासह भरण्यासाठी हमी घेतली होती. ही हमी घेऊन तीन वर्षे झाली. मात्र, अजूनही थकबाकी भरली गेली नाही. थकबाकी भरण्यासाठी राज्य सरकारने संबंधित कारखान्यांना नोटिसा दिल्या होत्या, तरीही कारखान्यांनी थकबाकी भरली नाही.कारखादार त्यांचे, हमी घेणारे सरकारही त्यांचे, पोलिस त्यांचे, कारखान्यांचे लेखापरीक्षण करणारे त्यांचे, त्यामुळे कुणी कुणावर कारवाई करायची हा मोठा प्रश्न आहे. या कारखान्यांची मालमत्ता जप्त करणे गरजेचे आहे.’’
शिवाजी नलवडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना