आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरणे निकाली काढण्यात महाराष्ट्र देशात अव्वल, न्यायाधीश कुलकर्णी यांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे निकाली निघतात. ही प्रकरणे निकाली काढण्यात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. याबाबतीत राज्य पहिल्या क्रमांकावरच रहावे, यासाठी जास्तीत जास्त प्रकरणे तडजोडीने मिटवावी. वाद मिटल्यानंतर दोघांमधील दोष भावना कमी होते, असे प्रतिपादन जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अ.नगर शहर वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतला न्या. रानडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, दीपप्रज्ज्वलन करून न्या. कुलकर्णी यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा, प्राधिकरणचे सचिव न्या. एम. एच. शेख, सदस्य शिवाजी कराळे, न्या. एस. के. केवले, न्या. पी. बी. जाधव, न्या. व्ही. व्ही. कुलकर्णी, न्या. एच. एम. देशपांडे, न्या. ए. एन. चौरे, न्या. पी. डी. डिग्रसकर, न्या. व्ही. जी. मोहिते, न्या. एन.डी. खोसे, न्या. आर.व्ही. ताम्हणेकर, सरकारी वकील सतीश पाटील, संघाचे अध्यक्ष अॅड. मुकुंद पाटील आदी उपस्थित होते. न्या. कुलकर्णी म्हणाले, प्रत्येकाने दोष भावना कमी करून प्रेम भावना वाढवावी. वाद मिटवण्याचा प्रयत्न करून आपले जीवन आनंदी होण्यासाठी कुटुंब सुखी राहण्यासाठी प्रयत्न करावे. सूत्रसंचालन आभार अॅड. शिवाजी कराळे यांनी मानले.
लोकअदालतमध्ये आली १६ हजार १३८ प्रकरणे

जिल्ह्यातून या लोकअदालतमध्ये १६ हजार १३८ प्रकरणे आली आहेत. मुख्यालयात दाखल पूर्वीची प्रकरणे २,४७५, दाखल प्रकरणे ४०३ अशी एकूण २८७८ प्रकरणे आहेत. जिल्ह्यात १० हजार ७७२ दाखलपूर्व प्रकरणे, तडजोडीसाठी २४७ प्रकरणे आहेत. एकूण पॅनेल १४ आहेत, असे सचिव शेख यांनी सांगितले.

राष्ट्रीय लोकअदालतचे उद्घाटन करताना जिल्हा प्रधान न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी. समवेत ए. झेड. ख्वाजा, एम. एच. शेख, सतीश पाटील, अॅड. मुकुंद पाटील आदी.
बातम्या आणखी आहेत...