आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात समन्यायी पाणी वाटप धोरण राबवावे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी - राज्यात पाणीप्रश्नावर सरकारने सर्वसमावेशक धोरण ठरवले नाही तर राज्यात संघर्ष उभा राहील. आतापर्यंत सरकारने या धोरणाकडे पाठ फिरवली आहे. लवकरात लवकर सरकारने राज्यात समन्यायी पाणी वाटप धोरण जाहीर करावे, अशी सूचना पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी लोणीत पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले, राज्यात समन्यायी पाणी वाटप धोरण न राबवल्यास ते राज्याच्या व जिल्ह्याच्या ऐक्याला धोका ठरणारे आहे. आगामी निवडणुकांमध्ये पाणीप्रश्नाचा वाद उफाळून येणार नाही यासाठी समन्यायी पाणी वाटप करून शेतकर्‍यांना न्याय देण्याची गरज आहे. केवळ पदासाठी हुर्ज‍यांची फौज निर्माण होत आहेत. सर्वत्र पाणीमाफियांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.