आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंडेगाव ते पुणे दरम्यान एसटी बससेवा पूर्वपत करा अन्यथा आत्मदहन- भापकर गुरूजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव ते पुणे दरम्यान सुरु असलेली बस पुन्हा सुरु न झाल्यास आत्मदहन करेन, असा इशारा महाराष्ट्राचे ‘मांझी’ म्हणून ओळख जाणा-ाय भापकर गुरुजींनी दिला आहे.
 
भापकर गुरुजींनी स्व-खर्चातून एका भल्या मोठ्या टेकडीवरून रस्ता काढत गावाला रस्ता तयार करून दिला. त्यानंतर एसटी महामंडळाकडे वारंवार पाठपुरावा करुन गुंडेगाव ते पुणे ही बससेवा सुरु केली. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून कोणतेही कारण न देता ही बससेवा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना आता त्रास सहन करावा लागत आहे.
 
दरम्यान, बंद करण्यात आलेली गुंडेगाव-पुणे बस सेवा तत्काळ सुरु करावी अशी मागणी भापकर गुरुजींनी केली आहे. बस सुरु न केल्यास रास्ता रोको करू तसेच गरज पडल्यास आत्मदहनही करू, असा इशारा भापकर गुरुजींनी दिला आहे. भापकर गुरुजींच्या या इशाऱ्यानंतर आता एसटी महामंडळाने ही बससेवा सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे.
 
बातम्या आणखी आहेत...