आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले यांचे टपाल तिकीट काढण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सत्यशोधक समाजाची निर्मिती करून जगाला मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले या थोर समाजसुधारकाचे चित्र असलेले टपाल तिकीट काढावे, अशी मागणी ओबीसी परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांनी केली.

नगर तालुक्यातील नेप्ती येथील सावता मंदिरात सावता ग्रुपतर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रम राबवून साजरी करण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.

प्रारंभी मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश कार्यकर्त्यांनी दिला. रामदास फुले यांच्या हस्ते जोतिबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नानासाहेब बेल्हेकर यांनी फुलेंविषयी माहिती सांगितली.


फुले म्हणाले, भारतातील पहिली मुलींची शाळा महात्मा फुले यांनी काढली. तसेच बालविवाह, सतीप्रथा, भ्रूणहत्या अशा रुढी नष्ट करण्यासाठी त्यांनी समाजाचे प्रबोधन केले. सत्यशोधक समाजाची निर्मिती करून मानवतेचा संदेश दिला. अशा थोर समाजसुधारकाच्या चित्राचे टपाल तिकीट काढण्याची गरज आहे.

या वेळी माजी सरपंच जालिंदर शिंदे, भानुदास फुले, नानासाहेब बेल्हेकर, संतोष बेल्हेकर, विशाल राऊत, बाळासाहेब नेमाणे, अशोक राऊत आदी उपस्थित होते. पंचक्रोशीतील ग्रामस्थही मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी आले होते.