आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कनिष्ठ संशोधन सहायक पदाच्या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे यापूर्वी झालेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे. चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्यांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे विद्यापीठाच्या कुलसचिवांना देण्यात आले.
विद्यापीठातील कनिष्ठ संशोधन सहायक पदांच्या भरतीसाठी लेखी व तोंडी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात प्रकल्पग्रस्तांना नियुक्तीपत्रापासून वंचित ठेवण्यात आले. डावललेल्या प्रकल्पग्रस्तांनी तक्रार केल्यानंतर तत्कालीन कुलसचिव भानुदास पालवे यांनी तातडीने सर्व विभागांना आदेश पाठवून नियुक्ती आदेश दिलेल्या कनिष्ठ संशोधक सहायकांना हजर करून घेण्यास स्थगिती दिली. मात्र, पालवे यांची बदली होताच संबंधित सर्वच उमेदवारांना हजर करून घेण्यात आले.
महाराष्ट्र संशोधन व शिक्षण कृषी परिषदेचे संशोधन संचालक उत्तमराव कदम यांच्याकडे या भरती प्रक्रियेची चौकशी सोपवण्यात आली. या चौकशी अहवालात कुलगुरु डॉ. तुकाराम मोरे यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. कदम यांनी विद्यापीठाच्या भेटीदरम्यान विद्यापीठ स्तरावर चौकशी करून निर्णय घेण्याचे सूचित केले. मात्र, ही चौकशी नि:पक्षपातीपणे होणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी हे निवेदन कुलसचिव सुनील वानखडे यांना दिले. दरम्यान, विद्यापीठ स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली आहे. ही समितीच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कुलसचिव खेडकर यांनी दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.