आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahavitaran Take Action Against Fake Electricity Reading Agency

चुकीचे रिडिंग घेणार्‍या एजन्सीवर महावितरण करणार कारवाई

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारनियमन करू नये, तसेच चुकीची बिले दुरुस्त करावीत, अशी मागणी आमदार अनिल राठोड यांनी शुक्रवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रभाकर हजारे यांच्याकडे केली. चुकीची बिले आकारणार्‍या एजन्सीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन हजारे यांनी दिले.

सध्या सुरू असलेले भारनियमन व वीजग्राहकांच्या विविध प्रश्नांवर आमदार राठोड यांच्या उपस्थितीत दुपारी एक वाजता बैठक झाली. माजी महापौर भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, अर्चना देवळालीकर, संदीप कुलकर्णी, निर्मला धुपधरे, मुक्ता मेटे, संगीता ससे, लता पठारे आदी यावेळी उपस्थित होते.