आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश पतसंस्थाप्रकरणी चार जणांच्या कोठडीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भिंगार येथील महेश नागरी पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींच्या पोलिस कोठडीत शनिवारपर्यंत वाढ झाली. पतसंस्थेतील सोनेतारण गैरव्यवहार फसवणुकीच्या आरोपावरुन आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी रात्री चौघा आरोपींना अटक केली होती. नीलेश अशोक जाधव, नितीन विलास शिंदे, शुभम बापूसाहेब दारकुंडे, रवींद्र बाबुराव गोरडे अशी पोलिस कोठडीत वाढ झालेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, याच गुन्ह्यात गुरुवारी रात्री आणखी एकाला अटक करण्यात आली. संदीप सुरेश माळवदे (नेहरु चौक, भिंगार) असे त्याचे नाव आहे. पतसंस्थेचे व्यवस्थापक प्रवीण भोकरे यांनी याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालक यांच्यासह एकूण २२ जणांना अटक झाली आहे. नंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अजित लकडे, पोलिस कर्मचारी बाळासाहेब राठोड, लक्ष्मण खोकले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

नीलेश अशोक जाधवकडे असलेल्या सोन्यापैकी काही सोने बनावट असल्याचे आढळून आले आहे. सखोल तपासाकरिता या आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी तपासी अधिकारी सरकारी वकिलांनी न्यायालयात केली.
बातम्या आणखी आहेत...