आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’च्या उघड झालेल्या मालमत्तेच्या निर्णयासाठी सक्षम प्राधिकारी नियुक्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती शहर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेयच्या तपासादरम्यान अमरावती शहरासह राज्यातील अनेक ठिकाणची मालमत्ता उघड केली आहे. त्यापैकी चार ठिकाणी असलेल्या ४७ कोटींच्या मालमत्तेवर निर्णय घेण्यासाठी अमरावती जिल्हाधिकाऱ्यांनी सक्षम प्राधिकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
अमरावती शहरात मैत्रेयविरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. या तपासात पोलिसांनी शहरासह जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, जळगाव शहर, मुंबईतील कळवा या चार ठिकाणी जवळपास ४७ कोटींची मालमत्ता उघड केली होती. या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नियुक्त करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकाऱ्यांनी अमरावती शहरातील मालमत्तेवर निर्णय घेण्यासाठी अमरावती उपविभागीय अधिकारी, तसेच जळगाव मुंबईसाठी त्या ठिकाणी असलेले निवासी उपजिल्हाधिकारी किंवा उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईनंतर न्यायालयाच्या निर्णयाने पोलिसांनी उघड केलेल्या मालमत्तेवर निर्णय घेण्यात येणार आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक गणेश अणे यांनी दिली.

गुंतवण्ूकदारांना दिलासा नाही : मागीलदोन वर्षात पोलिसांकडून श्रीसूर्या, राणा लॅन्डमार्क, वासनकर, सात्विक इनव्हेसमेंट आणि आता मैत्रेयमध्ये तपास पूर्ण करून सक्षम प्राधिकारी नेमण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानूसार वरील प्रकरणांपैकी वासनकर प्रकरण वगळता चारही प्रकरणात सक्षम प्राधिकारी नियुक्त झाले. त्यामध्ये मैत्रेय अलीकडचे प्रकरण आहे. पण उर्वरित तीन प्रकरणांमध्ये मागील वर्षभरापासून कोणतीही प्रगती झाली नाही. त्यामुळे गुंतवण्ूकदारांना दिलासाच मिळू शकला नाही. कारण पोलिस तपास करतात, फसवणूक करणाऱ्यांची कोट्यावधींची मालमत्ता उघड करतात, त्यावर सक्षम प्राधिकारी नेमले जातात मात्र त्यापुढे काहीही झालेले नाही. त्यामुळे दिलासा मिळालेला नाही.

तक्रारदार १३ हजार, रक्कम २० कोटींवर
अमरावती शहरात मार्च महिन्यात मैत्रेयविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान जुलै महिन्यापर्यंत हे प्रकरण शांत होते. मात्र जुलै महिन्यापासून तक्रारदारांचा पोलिसांकडे ओघ वाढला. अजूनही तक्रार सुरूच आहे. सध्या पोलिसांकडे १३ हजार गुंतवणूकदारांनी तक्रार दिल्या असून फसवणूकीची रक्कम २० कोटींवर पोहचली आहे.
बातम्या आणखी आहेत...